कॅम्पा

कम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटी (कॅम्पा) हे वनजमीनीचा वनोतर वापरसाठी वनजमीनीच्या भरपाई करण्याकरीता वनीकरण आणि पुर्नउत्पादन उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा मार्ग आहे.


खालील आदेशासह माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय कॅम्पा सल्लागार परिषद स्थापन करण्यात आली आहे:-


१. राज्य कॅम्पा साठी विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे देणे.

२. राज्य कॅम्पा ला आवश्यक असणारी वैज्ञानिक, तांत्रिक आणि इतर सहाय्याची सोय करणे.

३. राज्य कॅम्पाला त्यांच्या योजना आणि कार्यक्रमांच्या पुर्नविलोकनाच्या आधारे शिफारसी करणे.

४. आंतर-राज्य किंवा केंद्र-राज्य स्वरूपाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य कॅम्पाला यंत्रणा प्रदान करणे.


वनविकास महामंडळला (कॅम्पा) अंतर्गत वन विभागाकडून नैसर्गिक पुनरुत्पादन, वन व्यवस्थापन, संरक्षण, मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास, वन्यजीव संरक्षण आणि व्यवस्थापन इत्यादीसाठी निधी प्राप्त झाला करणे.