दर्जेदार सागवान जडी

प्रामुख्याने साग रोपणात सागाचे खोड मुळ किंवा जडी लागवड साहीत्य म्हणून वापरले जाते. नर्सरीतून उपटलेली एक वर्षाची निरोगी रोपे १५-२० सें.मी. मुळाचा आणि २.५ सेमी खोडाच्या भागामध्ये एक सेमीपेक्षा जास्त जाडीची कापून खोड मुळ/जडी तयार केले जाते. वनविकास महामंडळ हे देशभरात दर्जेदार सागवान जडी पुरवण्यासाठी ओळखले जाते. बियाणे उत्पादन क्षेत्रे आणि बियाणे बाग यासारख्या ओळखल्या गेलेल्या सर्वोत्तम बियाणे स्त्रोतांकडून गोळा केलेल्या जोमदार बियाण्यांमधून दर्जेदार सागवान जडी तयार करण्याचे काम रोपवाटीकेत केली जाते तसेच रोपवाटिकेत जोमदार कलिंगचा अवलंब केला जातो. ज्यामुळे रोपवनातील सागाचे उत्पन्न वाढीवण्याची हमी मिळते.