टर्न की प्रकल्प

महाराष्ट्र वनविकास महामंडल (म.व.वि.म.) द्वारे सन १९९० पासून टर्नकी अंतर्गत प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत शासकीय विभाग, महामंडळे, स्वायत्त संस्था व सार्वजनिक संस्था यांच्या मालकीचे क्षेत्रावर त्यांच्या विनंतीवरुन दोघांच्या सहमतीने ठरविलेल्या शर्ती व अटींच्या आधारे रोपवन करुन कामे पूर्ण झाल्यावर असे रोपवन क्षेत्र, क्षेत्र मालकास परत करण्यात येते.


या कार्यक्रमांतर्गत म.व.वि.म. कडून आतापर्यंत सुमारे रु. १६२९३.०८ लक्ष इतक्या रक्कमेचे ४३१ प्रकल्प कामे पूर्ण झालेले आहेत. याशिवाय सद्या राबविण्यात येत असलेले प्रकल्प महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, नागपूर, पुणे, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्हात पसरलेले आहेत. टर्न की अंतर्गत रोपवन प्रकल्पामुळे खाणी व औद्दोगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण होण्यास मदत झाली आहे. तसेच शहरी क्षेत्राचे सुशोभिकरण झालेले आहे. आजपर्यंत टर्नकी प्रकल्पाअंतर्गत ४३६१.७६ हेक्टर क्षेत्रावर ८९.३८ लक्ष रोपांची लागवड म.व.वि.म. मार्फत करण्यात आली आहे.


सद्य:स्थितीत ९ प्रकल्प यंत्रणांकरिता रु. ३००४.०६ लक्ष किंमतीचे व ३.७३ लक्ष रोपे लागवडीचे उद्धीष्ट सन २०१७-१८ ते २०२६-२७ या कालावधीकरिता ठरविण्यात आलेले आहे. रोपांच्या लागवडकरीता ३५६.६३ हेक्टर क्षेत्र मिळालेले आहे.


म.व.वि.म. द्वारे वेस्टर्न कोल फिल्ड लिमीटेडचे कॉर्पोरेट दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत वनविभागाचे क्षेत्रावर सन २०१४ ते सन २०१५ या कालावधीत रु. ५५२.७९ लाख रकमेचे ३ प्रकल्प वनविभागाचे २५०.०० हेक्टर अवनत क्षेत्रावर चंद्रपुर व यवतमाळ जिल्हयामध्ये घेण्यात आले व सदर क्षेत्रामध्ये एकूण २.७८ लक्ष रोपांची लागवड करण्यात आली असुन सदर प्रकल्प पुर्ण झाले आहेत.


प्रदेश आतापर्यंत पुर्ण झालेले प्रकल्प सद्या चालू प्रकल्प
संख्या रोपे (लक्ष) क्षेत्र (हे.) रक्कम रु. (लक्ष) संख्या रोपे (लक्ष) क्षेत्र (हे.) रक्कम रु. (लक्ष)
नागपूर ५२ ११.८९ ४८१.८९ ११७१.९६ ०.२९ २८.८३ २७.१४
चंद्रपूर २०९ ५०.७६ १९१४.१३ ४०१९.९०
नाशिक १७० २६.७३ १९६५.७४ १११०१.२२ ३.४४ ३२७.८० २९७६.९२
एकूण ४३१ ८९.३८ ४३६१.७६ १६२९३.०८ ३.७३ ३५६.६३ ३००४.०६