वन्यजीव संवर्धन

व्यवस्थापनाचे विशेष उद्यीष्टे

१. महामंडळाच्या क्षेत्रात आढळणाऱ्या वन्यजीवांच्या अधिवासात सुधारणा करुन त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे.
२. वन्यजीवांना संरक्षण आणि निवारा देऊन त्यांच्या संख्या वृदधीकरीता व्यवस्थापन करणे.
३. परिसराची जैवविविधता जतन करणे.
४. परिसरातील वन्यजीवांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे.
५. मनुष्य प्राणी संघर्ष परिस्थिती कमी करणे.
६. वन्यजीव आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरीता पायाभूत सुविधा मजबूत करणे.
७. वन्यजीवांच्या देखरेखीसाठी ट्रॅप कॅमेरा सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर ‍ करणे.

अधिवास विकास कामे

१. पाणवठे विकास.
२. सर्व बारमाही पाणवठे जाणुन रेकॉर्ड केले जातील आणि नकाशांवर चिन्हांकित केले जातील.
३. पिण्याचे पुरेसे पाणी पुरविण्याकरीता उन्हाळ्यात गाळ काढण्यात येईल.
४. क्षेत्रांमध्ये नियमित अंतरावर अतिरिक्त पाणवठे तयार करणे.
५. अन्न / भक्ष्य उपल्बधता
६. लहान आणि मोठ्या पाणवठ्यांजवळील क्षेत्र शाकाहारी प्राण्यांसाठी कुरणात विकसित केले जातील.



वन्यजीव संरक्षण उपाययोजना

१. कर्मचा-यांमध्ये संवेदना उत्पती.
२. शिकार आणि व्यापारापासून संरक्षण.
३. अति चराई आणि आगीपासून जंगलाचे संरक्षण.
४. मनुष्य-प्राणी संघर्ष कमी करणे.

भविष्यातील व्यवस्थापन

१. वन्य प्राण्यांना मानवी वस्तीत जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी वैज्ञानिक अधिवास व्यवस्थापन करणे जणेकरुन मनुष्य-प्राणी संघर्षाची शक्यता कमी होईल.
२. वन्यजीवांची उपस्थिती आणि हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेराचा वापर केला जाईल.
३. कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी क्षेत्रीय कर्मचा-यांना दुर्बिणी प्रदान केली जाईल.
४. निरीक्षण मनोरे , संरक्षण कुटी मोक्याच्या आणि संवेदनशील ठिकाणी बांधल्या जातील.



मनुष्य-प्राणी संघर्ष

अधिवासाचे संकुचन, विखंडन आणि ऱ्हासाचा परिणाम म्हणजे वाढता मनुष्य-प्राणी संघर्ष आहे, यामुळे वन्यजीवांचा नाश होऊन वन्य प्राणी आणि सरंक्षित क्षेत्राविषयी वैर निर्माण झाले आहे.

मनुष्य-प्राणी संघर्षात झालेल्या दुखापती आणि नुकसानीची भरपाई

शासन निर्णय क्रमांक WLP- ०७१८/प्र. क्र.२६७/ एफ-१, दिनांक २६/०८/२०१९ अन्वये भरपाईचे सध्याचे दर निश्चित केले गेलेत ते खालीलप्रमाणे आहेत:



अनुक्रमांक घटनेचा प्रकार रक्कम
१. मृत्यू कायदेशीर वारसांना रु. १५.०० लाख
२. कायम अपंगत्व अपंग व्यक्तीला रु. ५.०० लाख
३. मोठी दुखापत जखमी व्यक्तीला रु. १,२५,०००/-
४. किरकोळ दुखापत औषधोपचाराची किंमत, शक्यतो शासकीय रुग्णालयात, परंतु अपरिहार्यतेच्या बाबतीत, खाजगी औषधोपचार, रु. २०,०००/- प्रति व्यक्ती पर्यंत मर्यादित.