कंपनी प्रोफाइल

महाराष्ट्र वन विकास महामंडळ, मर्यादीत (म.व.वि.म.) ची स्थापना १६ फेब्रुवारी १९७४ रोजी कंपनी कायदा, १९५६ अन्वये महाराष्ट्र राज्य सरकारची पूर्ण मालकी असलेली शासनाची उपकंपनी म्हणून करण्यात आली. समान ध्येय आणि उद्दिष्टे असलेले वन विकास मंडळ १९६९ पासून अस्तित्वात होते, ज्याचे रूपांतर महाराष्ट्र वन विकास महामंडळ, मर्यादीत (म.व.वि.म.) मध्ये झाले.


सागरोपवन वाढविणे, त्याची कापणी, इमारत व इतर वनउपजांचे विपणन करण्याचा पाच दशकाहुन अधिक अनुभव असणारी उत्पादन वनीकरण क्षेत्रातील अग्रेसर महामंडळ आहे. देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापित सार्वजनिक क्षेत्रातील सातत्याने नफा कमावण्याचा आणि सरकारला लाभांश देण्याचा ट्रक रेकॉड असलेले महामंडळ आहे. म.व.वि.म. ची रोपवने शाश्वत व्यवस्थापनाच्या तत्त्वांनुसार काटेकोरपणे व्यवस्थापित केली जाते. महामंडळाच्या मार्फत झालेल्या रोपवनाचे सध्याचे मुल्य रु. ४००० कोटी पेक्षा जास्त असुन ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये महामंडळ मोठया प्रमाणात योगदान देत आहे.



कार्यक्षेत्र


महाराष्ट्र सरकारने ०३.४३ लाख हेक्टर जंगल महामंडळाला त्यांच्या उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिले आहे. ते राज्याच्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ०६.०० टक्के इतके आहे. महामंडळ ला भाड्याने दिलेले वनक्षेत्र हे ३ प्रदेशातं विभागले असुन त्याअंतर्गत १२ वन प्रकल्प विभाग आणि बल्लारशाह येथे १ आगार विभाग कार्यरत आहे.


कंपनीकडे भाडेतत्त्वावर दिलेल्या वनक्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-


प्रदेश क्षेत्र (हेक्टर मध्ये)
नागपुर १,०९,८२१
चंद्रपुर १,४५,१९६
नाशिक ८८,४८७
एकुण ३,४३,५०४

इतर वृक्षारोपण कार्यक्रम


महामंडळ बाह्य संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर यशस्वीरीत्या रोपवणाची निर्मिती करीत आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, इंडियन एअर फोर्स, बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांसारख्या अनेक संस्थांच्या जमीनीवर “टर्नकी रोपवन” करण्यात आली आहेत. अशाप्रकारे महामंडळ विविध सरकारी योजनांतर्गत आणि कॉर्पोरेट हरित उपक्रमांचा एक भाग म्हणून निकृष्ट वनजमिनीवर देखील वृक्षारोपण करते.


बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान


काही वर्षांपूर्वी, गोरेवाडा, नागपूर येथील जागतिक दर्जाच्या प्राणिसंग्रहालयाची रचना, बांधकाम आणि संचालन करण्याचे काम महाराष्ट्र सरकारने महामंडळ कडे सोपवले होते. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान ही महामंडळाची उत्पत्ती आहे, ज्याचे उद्घाटन २६ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. वाघ, पँथर, अस्वल यांसारखे वन्य प्राणी आणि तृणभक्षी प्राण्यांच्या विविध प्रजाती त्यांच्या जवळच्या नैसर्गिक अधिवासात दाखवून हे उद्यान नागपुरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून बहरले आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पामध्ये आफ्रिकन सफारी, वॉक-इन एव्हियरी, ट्रायबल ट्रेल आणि वॉकिंग ट्रेल यासारखी अनेक आकर्षणे जोडली जाणार आहेत.


वनोपज उत्पादन व विक्री


महामंडळ दरवर्षी सुमारे ५०,००० घनमीटर इमारती लाकूड निर्मिती ‍करते . त्याची विक्री लिलावाद्वारे केली जाते. ग्राहकांना स्पर्धात्मक किमंतीत दर्जेदार लाकडाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, महामंडळने नुकतेच चिराण लाकडाचे उत्पादन आणि विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली येथे स्थापित सरकारी आरागिरणीचे रूपांतर करून एक उत्पादन युनिट स्थापन करण्यात आले आहे. भविष्यात अश्या आणखी उत्पादन युनिट्ससह महामंडळ सर्वोत्तम दर्जेदार चिराण लाकडाचा विश्वासार्ह पुरवठादार म्हणून भारतीय लाकूड बाजारपेठेत मोठा प्रभाव पाडण्यासाठी तयार आहे.


इतर उपक्रम


महामंडळ ने पर्यावरण पर्यटन, औषधी वनस्पतींची लागवड , इमारत लाकूड आणि बांबूचे मूल्यवर्धन यांसारख्या इतर अनेक क्षेत्रांमध्येही विविधता आणली आहे. इतर अनेक हरित उपक्रमही सुरू होत आहेत. महामंडळ च्या सामाजिक व्यवसायिक जबाबदारी (CSR) निधीचा उपयोग शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक उपक्रमांच्या प्रभावी समर्थना करीता केला गेला आहे.