गांडुळ खत

गांडूळ- खत हे उत्कृष्ट जैव-सेंद्रिय खत आहे. गांडूळ- खत मातीत चांगले मिसळते त्यामुळे मातीची संरचना आणि सच्छिद्रता सुधारते. त्यात नत्र, स्फुरद, पलाश आणि सूक्ष्म पोषक घटक (मॅगनीज, झिंक, लोह, मॉलिब्डेनम, बोरॉन, तांबे इ.) असतात. गांडूळ-खत मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यास आणि मातीची धूप कमी करण्यास मदत करते.