औषधी वनस्पती प्रजाती

महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्रमांक एफडीएम-२००५/सीआर ५५/एफ-२ दि. २६-०२-२०१० द्वारे महाराष्ट्र वनविकास महामंडळ अंतर्गत स्वतंत्र औषधी वनस्पती संवर्धन आणि विकास शाखा तयार करण्यास मान्यता दिली. शासननिर्णया नुसार, वनविकास महामंडळाच्या संचालक मंडळाने दि. २१-०५-२०१० च्या १५२ व्या बैठकीत स्वतंत्र औषधी वनस्पती शाखा निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला. व्यवस्थापकीय संचालक, एफडीसीएम यांनी त्यांचे पत्र क्र. एडीएम/आस्थापना/३४५३/८८५, दिनांक ३१-०५-२०१० अन्वये ०१ जून २०१० पासून महाराष्ट्र वनविकास महामंडळ अंतर्गत `स्वतंत्र औषधी वनस्पती शाखा' स्थापन करण्याचा आदेश जारी केला.


दिनांक २६ फेब्रुवारी २०१० च्या शासन निर्णयानुसार औषधी वनस्पती शाखेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.


१.वनौषधी, सुगंधी आणि खाद्य वनस्पतींचे सर्वेक्षण करुन त्याच जागेवर संवर्धन करणे आणि खात्रीलायक डेटाबेस स्थापित करणे.


२. वरील वनस्पती प्रजातींची कंत्राटी पद्धतीने लागवड करून व त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीची सोय करून वनोत्तर भागात हिरवळ वाढवणे.


३. राज्यातील जनतेला नैसर्गिकरित्या उपलब्ध खाद्य उत्पादन आणि इतर उपयुक्त आयुर्वेदिक औषधी तसेच ‍ लाकूडत्तेर वनोपज परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे.


४. राज्यातील पडीक जमिनीवर पर्यायी पिकांच्या सेंद्रिय लागवडीसाठी वृक्षारोपण मॉड्यूलचे प्रमाणीकरण करणे


५. राज्य, देशात आणि परदेशात शुद्ध उत्पादनांच्या वितरणाद्वारे भारतीय आयुर्वेदिक औषधांच्या प्रणालींना प्रोत्साहन देणे. . वनस्पती उत्पादनांसाठी प्रमाणन आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी सुविधा उभारणे.


६. वनक्षेत्राची उत्पादकता वाढवणे.



शासन निर्णयांने कामांची रूपरेषा विहित केल्याप्रमाणे वनविकास महामंडळामध्ये स्थापन केलेल्या औषधी वनस्पती संवर्धन आणि विकास शाखेद्वारे प्रस्तावित कामे/योजनांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.


१. निवडलेल्या संवर्धन क्षेत्रातील दुर्मिळ वनस्पतींचे त्यांच्या क्षेत्रात संवर्धन करणे.


२. विशेषत: ज्यांची मुळे आणि साल वापरतात अशा प्रजातींसाठी वनक्षेत्रातून या वनस्पती संकलन करणाऱ्यांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे.


३. शहरी भागात औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या घरगुती वापरासाठी वनस्पती उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, नक्षत्र वन आणि दशमूल वृक्षारोपण उद्यानाची स्थापना करणे.


४. औषधी, सुगंधी, खाद्य आणि नैसर्गिक रंग देणाऱ्या वनस्पतींच्या लागवडीस प्रोत्साहन देणे.


५. वन व्यवस्थापन समिती समित्यांद्वारे जंगलातून या वनस्पतींचे मोठ्या प्रमाणावर संकलन करणे.


६. प्रदूषण नियंत्रण वनस्पती रोपे तयार करुन त्यांची स्थानिक जनतेला विक्री करण्यासाठी आधुनिक रोपवाटिका उभारणे.


७. योग्य प्रक्रीया आणि मूल्यवर्धनानंतर वन उत्पादनांची विक्री आणि निर्यात करणे.औषधी वनस्पतींची निर्यात करण्यापूर्वी राष्ट्रीय जैव-विविधता प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेणे.


८. औषधी वनस्पतींवर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया संयंत्रे आणि प्रयोगशाळा स्थापन करणे. प्रशिक्षण केंद्रे, किरकोळ दुकाने, कारखाना आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे.


वरील र्निदेशाच्या अनुषंगाने कम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन मॅनेजमेंट प्लॅन अथॉरिटी (कॅम्पा), १३ वा वित्त आयोग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एनएमपीबी) नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ (एमएसएच आणि एमपीबी), पुणे प्राप्त निधीतून तसेच वनविकास महामंडळाचे स्त्रोतातुन वनौषधी उद्यानांची निर्मिती, औषधी वनस्पती रोपवाटिकांची स्थापना, औषधी वनस्पतींचे एक्स-सीटू वृक्षारोपण, औषधी वनस्पतींचे जागेवरच एक्स-सीटू संवर्धन, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण इत्यादी उपक्रम, हाती घेण्यात आले आहे.


वनविकास महामंडळामध्ये स्थापन केलेल्या औषधी वनस्पती संवर्धन आणि विकास शाखेची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे.


वनविकास महामंडळामध्ये औषधी वनस्पती संवर्धन आणि विकास शाखा स्थापन केल्यापासून, अनेक उपक्रम सुरू केले गेले आहेत आणि अजूनही चालू आहेत. इन-सीटू संवर्धन, एक्स-सीटू संवर्धन आणि वृक्षारोपण, वनौषधी उद्यान विकसित करणे आणि वृक्षारोपणासाठी औषधी वनस्पतींसाठी रोपवाटिका उभारणे यासह कामांसाठी विविध स्त्रोतांकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत.


फाउंडेशन ऑफ रिव्हिटलायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेडिशन्स (एफआरएलएचटी) नुसार, बंगलोर डेटाबेस नुसार औषधी वनस्पतींच्या ९६० प्रजातींची विक्री केली जाते, त्यापैकी १७८ मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. या प्रजाती त्यांच्या पुरवठ्याच्या प्रमुख स्त्रोतांद्वारे दर्शवितात की समशीतोष्ण जंगलांमधून २१ प्रजाती आणि उष्णकटिबंधीय जंगलांमधून ७० प्रजाती मिळतात. महाराष्ट्रातील जंगलात ७० प्रजाती पैकी ४८ प्रजाती आढळतात. २००१ मध्ये एफआरएलएचटी ने संवर्धनाच्या दृष्टीने ३५ औषधी वनस्पतींच्या प्रजातींची यादी तयार केली आहे. वनविकास महामंडळ मधील औषधी वनस्पती शाखेद्वारे रोपवाटिका, इन-सीटू संवर्धन, पूर्व-स्थिती संवर्धन आणि वृक्षारोपण यासाठी शक्य तितक्या औषधी वनस्पतींचा वापर केला जातो.


भूतकाळातील आणि सद्यस्थितीतील केलेले उपक्रम खालीलप्रमाणे आहेत.


१. भारत सरकारच्या निधीतून युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) प्रकल्पांतर्गत सन २००९-१० आणि सन 2010-11 मध्ये सुमारे ४.०० लाख औषधी वनस्पतींची रोपे तयार करण्यात आली असुन त्याचे वितरण राज्यशासनाच्या वन, सामाजिक वनीकरण आणि कृषी या विभागांमार्फत केले.


२. केंद्र सरकारच्या एनएमपीबी, नवी दिल्ली योजनांद्वारे नाशिक विभागात औषधी वनस्पतींच्या प्रजाती गुळवेल, काळमेघ आणि सर्पगंधा यांची सन २००९, २०१० आणि २०१२ च्या कालावधीत १२५.६०० हेक्टर क्षेत्रावर लागवड व वाढ करण्यात आली.


३. नागपूर, नाशिक आणि डहाणू येथे सन २०११ च्या कालावधीत एकूण १३.०० हेक्टर क्षेत्रावर उपरोक्त योजनांद्वारे हर्बल गार्डन्स तयार करण्यात आले.


४. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी लागवड मंडळ, हे राज्यस्तरीय मंडळ एनएमपीबी अंतर्गत औषधी वनस्पतींशी संबंधित सर्व बाबींच्या समन्वयासाठी एक एजन्सी आहे. सन २०१३-१४ मध्ये प्रस्तावित बारा प्रकल्प एमएसएच व एनएमपीबी द्वारे मंजूर केले गेले ज्यात रोपवाटिका, ड्रायिंग शेड आणि औषधी वनस्पती गोळा करुन त्याची साठवण करण्याकरीता गोदामे इत्यादीचा समावेश आहे. त्यासोबतच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरीता , औषधी वनस्पतींच्या विपणनाला चालना देण्याकरीता महाराष्ट्र वनविकास महामंडळाने ९ फेब्रुवारी-२०१४ ते १३ फेब्रुवारी-२०१४ पासून सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात नागपूर येथे खरेदीदार-विक्रेता मेळावा, कार्यशाळा, प्रशिक्षणे आयोजित केली आहेत. राष्ट्रीय फेअर कम प्रदर्शनात भाग घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्स विभागातर्फे नागपूर येथे आयोजित "सेकंड इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ सोसायटी फॉर एथनो फार्माकोलॉजी" मध्ये सह-आयोजक म्हणून भाग घेतला.


५. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या औषधी वनस्पती शाखेने ७४८.१०० हेक्टर क्षेत्रावर एक्स-सीटू वृक्षारोपण उपक्रम राबवले आहेत. सन २००९ ते सन २०१५ पावसाळ्यात औषधी वनस्पती प्रजातींच्या ८२,६२,६५६ रोपांची लागवड करण्यात आली त्याकरीता एनएमपीबी, १३ व्या वित्त आयोग आणि महाराष्ट्र वनविकास महामंडळा अंतर्गत मंजुर निधीचा वापर केला गेला.


६. महाराष्ट्र राज्य शासनाने दि. २६/०२/२०१० च्या ठरावात विहित केल्याप्रमाणे महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या औषधी वनस्पती शाखेची स्थापन करण्यात आली असुन त्याच्या उददीष्टानुसार हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि विकास क्षेत्रे स्थापन करणे समाविष्ट आहे. त्यानुसार नॅशनल मेडिसिनल प्लांट्स बोर्ड, नवी दिल्ली यांच्या अनुदानाअंतर्गत ३३०९.००० हे. क्षेत्रावर दुर्मिळ औषधी वनस्पतींचे सर्वेक्षण करण्यात आले असुन स्थानिक वन औषधी, सुगंधी आणि खाद्य वनस्पतींचा अस्सल डेटा बेस स्थापित केला गेला.


७. संस्थात्मक/सार्वजनिक वनौषधी उद्यानांमध्ये देशी ज्ञानावर आधारित औषधी वनस्पतींच्या वापराबाबत जनतेला जागरूक करण्याकरीता . २४ हेक्टर क्षेत्रावर नाशिक, ठाणे, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या नर्सरी भागात स्थापित केले आहेत. औषधी मूल्य असलेल्या औषधी, सुगंधी वनस्पतींची ४०,८५३ रोपे लावण्यात आली आहेत.


८. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्याकडे सन २०१३-१४ या वर्षात बारा प्रकल्प आणि सन २०१४-१५ एकोणीस प्रकल्प मध्ये मॉडेल नर्सरी, लहान रोपवाटिका, ड्रायिंग शेड, साठवण गोदामे यांचा समावेश असलेले मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. परंतु मंजुरांना विलंब झाला ज्यामुळे अनुक्रमे पुढील आर्थिक वर्षांमध्ये प्रकल्प स्थलांतरित झाले. या कालावधीत २ मॉडेल नर्सरी, ७ लहान रोपवाटिका उभारण्यात आल्या आणि १० ड्रायिंग शेड, १० गोदामे बांधण्यात आली.


९.राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, १३ वा वित्त आयोग आणि महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या ची अंतर्गत संसाधने यांसारख्या विविध योजनांतर्गत वर नमूद केल्याप्रमाणे सन २०१०-११ ते २०१५- या कालावधीत प्रशिक्षण, कार्यशाळा, खरेदीदार-विक्रेता संमेलन तसेच विविध प्रदर्शनांमध्ये सक्रिय सहभाग यासारखे विविध प्रचारात्मक उपक्रम आयोजित केले आहेत ते खालीलप्रमाणे.

i. प्रशिक्षण कार्यक्रम – १६

ii. कार्यशाळा – १२

iii. खरेदीदार-विक्रेत्याची बैठक - १

iv. कृषी-वसंत प्रदर्शन, नागपूर – १

v. दुसरी इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ सोसायटी फॉर एथनो फार्माकोलॉजी, नागपूर – १

vi. इतर प्रदर्शने – १

आयोजित प्रशिक्षण आणि कार्यशाळेत संबंधित प्रत्येक विभागातील कर्मचारी, स्थानिक वैदू, रहिवासी, शेतकरी, व्यापारी सहभागी झाले होते. त्‍यांनी खरेदीदार-विक्रेते मेळावा आणि प्रदर्शनांना उदंड प्रतिसाद दर्शविला आहे.


१०. अलीकडेच राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ , नवी दिल्ली यांनी ३ वर्षांसाठी इन- सिटू/एक्स-सीटू संवर्धन, संसाधन वाढ, सर्वेक्षण आणि आविष्कारीकरण उपक्रम कामासाठी रु. १५०.०० लाख प्रस्तावास मान्यता प्रदान केली आहे. ज्यात खालील कामांचा समावेश होतो.


i. गोदामाचे बांधकाम - ५ नग.


ii. ड्रायिंग शेड - ५ नग.


iii. सौरउर्जा ड्रायर १० टन क्षमता - ५ नग.


iv. प्रक्रिया घटक - १ नग.


v. पॅकिंग शेड आणि यंत्रसामग्री


vi. प्रक्रिया यंत्रसामग्री आणि घटक - २ नग.


vii. अंतीम उत्पादन भांडार रुम.


viii. गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा


ix. विपणन समर्थन


x. कर्मचारी आणि कार्यशाळा प्रशिक्षण.


वर नमूद केलेल्या उपक्रमांमध्ये स्थानिक महिला बचत गटांचा सहभाग असावा. चंद्रपूरच्या पश्चिम चांदा वन प्रकल्प विभागातील जुनोना, मामला आणि चिचपल्ली परीक्षेत्रात स्थानिक दहा महिला बचत गटांचा या उपक्रमांमध्ये सहभाग आहे.