महाराष्ट्र वनविकास महामंडल, मर्यादित (म.व.वि.म.) ही पूर्णत: महाराष्ट्र सरकारच्या मालकीची कंपनी असुन तीची स्थापना १९७४ मध्ये झाली आहे. म.व.वि.म. ला साग रोपवन करण्याचा आणि इमारती लाकुड, सरपन आणि बांबु यांसारख्या वन उत्पादनांची विक्री करण्याचा जवळपास पाच दशकाचा अनुभव आहे.
म.व.वि.म. च्या परिपक्व सागच्या वृक्षारोपवनातुन आणि शाश्वतपणे व्यवस्थापित जंगलांमधून सुमारे ५०,००० घनमीटर लाकडाची निर्मिती करते. ग्राहकांना दर्जेदार इमारती लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने अलीकडेच चिराण लाकडाचे उत्पादन आणि विपणन सुरू केले आहे.
कंपनी कडे आता अतिशय वैविध्यपूर्ण कार्यभार आहे, जसे की निसर्ग पर्यटन, औषधी वनस्पतींची लागवड, दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या वन्यजीवांचे इन-सीटू आणि एक्स-सीटू संवर्धन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. भारतातील सर्वात मोठ्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक असे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान ही म.व.वि.म. ची अभिमानास्पद निर्मिती आहे.