१. महाराष्ट्र राज्यात महामंडळाने भाडेतत्त्वावर, विकत किंवा वनसंसाधनाच्या दृष्टीने संपादन केलेल्या जमीनीवर साग, बांबू, खैर, सेमल यासारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रजाती तसेच कंपनीला योग्य वाटेल अशा इतर उपयुक्त प्रजातींचे वृक्षारोपण करणे.
२. सर्व प्रकारच्या संवर्धनात्मक प्रजातीच्या वन वनस्पती, झाडे , पिके , नैसर्गिक उत्पादने, इतर कृषी पिकांची लागवड
करुन उत्पादनांची निर्मिती करणे. त्यांची खरेदी, विक्री, आयात, निर्यात, प्रक्रिया, वितरण, इत्यादी व्यवहार करणे .
३. महामंडळाच्या मालकीच्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनींवर नैसर्गिकरीत्या उगवलेली किंवा रोपवन करण्यात आलेली वनस्पती, पिके यांचे संवर्धन, संरक्षण, जतन करणे.
४. अस्तित्वात असलेल्या जीवजंतूची देखभाल, जतन, संरक्षण आणि विकास करणे.
५. महामंडळाच्या मालकीच्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर नैसर्गिकरित्या किंवा लागवड करण्यात आलेल्या रोपवनातुन वन उत्पादनाची तोड करणे, प्रक्रिया करणे, त्याचे रूपांतर करने, वर्गीकरण करणे, प्रतवारी करणे, विपणन, प्रमाणित करणे, विक्री करणे आणि वितरण करणे.
६. लाकुड व्यापारी , लाकुड यार्ड, सॉ मिल , पेपर मिल, आणि लगदा उदयोग मालक यांचा व्यवसाय सुरु ठेवण्याकरीता यांना बाजारपेठ उपल्बध करुन वरील व्यवसायाकरीता लाकुड माल जसे की लाकडाचे ढीगारे, बल्ली लाकुड आणि इमारती लाकुड अशा सर्व प्रकारच्या मालाचे उत्पादन करुन व्यवहार करने तसेच यांच्याशी केलेल्या व्यवहाराद्वारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या नफा मिळवुन महामंडळाच्या संपत्तीमध्ये वाढ करणे.
७. प्लायवूड, पल्पवुड, मॅचवुड, हार्डवुड, फ्लोअरिंग आणि इतर कारणांसाठी लाकडी ब्लॉक्स, बॉक्स, खिडक्या, दरवाजे, लाकूड लगदा, लाकूड लोकर, मास्ट, स्पार्स, डेरिक्स, स्लीपर, टूल्स इत्यादी बनविण्याकरीता लाकडाचे विक्रेते म्हणून तसेच हँडलेस, पॅनेलिंग, लाकूडकाम, फर्निचर असे सर्व प्रकारचे उत्पादके जे पूर्णपणे किंवा अंशतः लाकडा पासुन किंवा लाकडांच्या टाकाऊ वस्तू किंवा लाकडांच्या उप-उत्पादनांपासून उत्पादने निर्मिती करणे व त्याचे अधिकृत विक्रते म्हणुन व्यवसाय करणे .
८. बाजारपेठेकरीता लागणारे लाकडाची प्रक्रीया, उत्पादन, करणे तसेच महामंडळाने उत्पादित केलेल्या सर्व सामग्री , वस्तू आणि त्यापासून मिळविलेल्या सर्व उप-उत्पादनांचा हिशोब ठेवणे .
९. सागवान लाकूड, प्लायवूड, पल्पवुड, मॅचवुड, हार्डवुड आणि अशा प्रत्येक वर्णाच्या उत्पादनाकरीता लागवड करणे व वनोपजाची निर्मिती करुन विल्हेवाट, विक्री आणि व्यवहार करुन अधिकृत विक्रेते म्हणून व्यवसाय करणे.
१०. वन उत्पादनांचे उत्पादन किंवा व्यवहार करणारे उद्योग किंवा संस्थांची स्थापना करणे, त्याचा मालकी हक्क घेणे व त्याचे व्यवस्थापन करणे.
११. सर्व प्रकारच्या वन बियाणे, उदयान बियाणे, शेतबियाणे आणि सर्व जातींचे चारा बियाणे यांचे उत्पादन किंवा
उप-उत्पादन यांची उत्पत्ती करुन ,त्यावर प्रक्रिया, निर्यात, आयात इत्यादी व्यवहार करणे.
१२. शासन किवा इतर प्राधिकरणाच्या योजना ज्या वने व वनीकरणाशी संबंधीत आहे अशाप्रकारच्या ट्रस्टचे व्यवहार
हाती घेणे, व्यवहार करणे, व योजना आमलात आणने.
१३. महामंडळाचे नफा करण्यासाठी ज्यांचे उददीष्ट साधले आहे असे कोणतेही व्यक्ती, महामंडळ, संस्था, यांच्याशी हितसंबधांचे संघटन, सहकार्य किंवा संयुक्त उपक्रम बाबत भागीदारी किंवा करार करणे आणि महामंडळाच्या फायदयासाठी अशी कोणतीही भागीदारी व्यवस्था चालु ठेवणे किंवा संपविणे.