क्लोनल रोपे

क्लोनल प्रपोगेशन म्हणजे वनस्पतिजन्य प्रसाराद्वारे अलैंगिक पुनरुत्पादनाद्वारे अनुवांशिकदृष्ट्या एकसारख्या प्रजातीचा प्रसार. क्लोनल तंत्रज्ञानाचा वेगळा फायदा मिळतो कारण क्लोनल रोपे थेट आनुवंशिकदृष्ट्या श्रेष्ठ झाडांच्या वनस्पतीजन्य भागातून तयार केली जातात जी मातृ रोपाप्रमाणेच अनुवांशिक गुणांसह जशीच्या तशी संतती देतात.


क्लोनल रोपांची श्रेष्ठता त्यांची जलद वाढ, उच्च उत्पन्न, रोग प्रतिकारशक्ती या सर्वांत इष्ट गुणांसह दिसून येते ज्यामुळे उच्च उत्पादकता, चांगली एकसमानता आणि उत्पादनाचे सुधारित गुण दिसून येतात. लोहारा (चंद्रपूर), चुलबंद (गोंदिया), मखमलाबाद (नाशिक) आणि वाडा (ठाणे) येथे प्रत्येकी दोन मिस्ट चेंबर्स असलेल्या चार क्लोनल रोपवाटिका १९९८ च्या हंगामापासून ८ लाख वनस्पतींची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता असलेल्या कार्यरत आहेत.


या कृतीसाठी निवडलेल्या प्रमुख प्रजातींमध्ये साग, सरु,‍ शिवन,शिसु, खैर, निलगिरी आणि फळांच्या प्रजाती जसे की चिंच, सिताफळ आणि आवळा यांचा समावेश आहे. सध्या आयटीसी भद्राचलम कडून प्रारंभी खरेदी केलेल्या निलगीरीच्या ४२ चाचणी केलेल्या आणि अनुवांशिकदृष्ट्या उत्कृष्ट क्लोनचे क्लोनल रोपे उत्पादनाधीन आहेत आणि इतर निवडलेल्या प्रजाती जसे की सरु, शिसू, चिंच यांच्यासाठी क्लोनल प्रसार देखील सुरू केला आहे.