रोपवन वस्तुसूची घटक

सन १९९३ मध्ये रोपवन वस्तूसूची घटक ची स्थापना करण्यात आली, जेणेकरून अस्तित्वात असलेल्या साग रोपवणाचे विश्लेषण व साग रोपवणाच्या उत्पादकतेचे मूल्यांकन करून एकूण वाढणारा साठा आणि त्याचे मूल्य याचा अंदाज लावता येईल.


पद्धती :


१. टप्पा -१ मध्ये साग रोपवन सन १९७० ते १९८७ आणि टप्पा २ मध्ये साग रोपवन सन १९८८ ते २०१० पर्यंतची माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण करण्यात येते.

२. साग रोपवन क्षेत्राच्या १% क्षेत्रात ०.२५ हे. ( ५० मी.× ५० मी. ) आकाराचे प्रातिनिधिक कायम स्वरुपी नमूना खंड रँडम पद्धतीने टाकण्यात येतात.

३. प्रत्येक नमुना खंडामध्ये उभ्या असलेल्या साग झाडांचे मोजमाप करून वाढत्या साठ्याचे विश्लेषण करण्यात येते, जेणेकरून विरळणी कामामुळे वाढत्या साठया मधील बदल, कमी वेढी वर्गाकडून मोठ्या वेढी वर्गाकडे संक्रमण , शिल्लक झाडांच्या संख्येत बदल इत्यादी बाबत स्पष्ट माहिती मिळावी.


उपलब्धी:


१. सन १९९५ ते २००० मध्ये ८९३४६.१९६ हे. क्षेत्रात २५५२ नमूना खंडामध्ये पहिली मोजणी करण्यात आली. त्यानुसार साग रोपवनामध्ये २५.१० लक्ष घ. मी. वृध्दीसाठा होता आणि सन २००० मध्ये लिलावात मिळालेल्या सरासरी विक्री किंमतीवर आधारित त्याचे मूल्यांकन रू १४०३.६५ कोटी इतके होते.

२. सन २००१ ते २००५ मध्ये ९०२३९.९५३ हे. क्षेत्रात ३४६३ नमूना खंडामध्ये दुसरी मोजणी करण्यात आली. त्यानुसार साग रोपवनामध्ये २८.४६ लक्ष घ. मी. वृध्दीसाठा होता आणि सन २००५ मध्ये लिलावात मिळालेल्या सरासरी विक्री किंमतीवर आधारित त्याचे मूल्यांकन रू १६४०.०४ कोटी इतके होते.

३. सन २००६ ते २०१० मध्ये ८९५७२.१७२ हे. क्षेत्रात ३६४३ नमूना खंडामध्ये तृतीय मोजणी करण्यात आली. त्यानुसार साग रोपवनामध्ये ३१.६० लक्ष घ. मी. वृध्दीसाठा होता आणि सन २०१० मध्ये लिलावात मिळालेल्या सरासरी विक्री किंमतीवर आधारित त्याचे मूल्यांकन रू ३१४२.८५ कोटी इतके होते.

४. सन २०११ ते २०१५ मध्ये ७००१०.७९५ हे. क्षेत्रात ३२७० नमूना खंडामध्ये चतुर्थ मोजणी करण्यात आली. त्यानुसार साग रोपवनामध्ये २५.१० लक्ष घ. मी. वृध्दीसाठा होता आणि सन २०१५ मध्ये लिलावात मिळालेल्या सरासरी विक्री किंमतीवर आधारित त्याचे मूल्यांकन रू ४६२०.७५ कोटी इतके होते.

५. सन २०१६ ते २०२० मध्ये ५४८२९.५७ हे. क्षेत्रात २७९१ नमूना खंडामध्ये पाचवी मोजणी करण्यात आली. त्यानुसार साग रोपवनामध्ये २०.६८ लक्ष घ. मी. वृध्दीसाठा होता आणि सन २०२० मध्ये लिलावात मिळालेल्या सरासरी विक्री किंमतीवर आधारित त्याचे मूल्यांकन रू ५११२.७३ कोटी इतके होते.