एफडीसीएम भवन, ग्रीन बिल्डिंग उपक्रम

एफडीसीएम भवन, ग्रीन बिल्डिंग उपक्रम

इमारती बांधकामांचा पर्यावरणावर दुष्पारीणाम होत असतो. हरीत इमारतीमुळे पर्यावरणांचे शासवत संवर्धन होत असुन इमारतीचे बांधकाम रचना, वापर आणि त्याची बांधणी अश्याप्रकारे केली आहे की, ज्यामुळे पर्यावरणावरील प्रभाव कमीतकमी होईल . हरीत इमारतीचे आरोग्यदायी व अधिक ऊर्जाक्षम वातावरण संसाधनांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्याची संधी देते. हरीत इमारती संसाधनांच्या संवर्धनाद्वारे पर्यावरणावर एक हलकी छाप टाकते आणि त्यासोबतच ऊर्जेचा कार्यक्षमतेने वापर, किफायतशीर, कमी देखभाल खर्चाबाबत समतोल राखला जातो. त्यामुळे हरीत इमारत हे बांधकाम आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याचे काम करते.


एफडीसीएम भवनात ग्रीन बिल्डिंग तरतुदी

१. इमारत आच्छादन कमी करण्यासाठी म्हणजेच जमिनीचा वापर कमी करण्याच्या हेतुने बहुमजली इमारत बांधली आहे. एफडीसीएम भवन ही ६ मजली (तळमजला +५) इमारत असून एकूण बांधलेले क्षेत्रफळ सुमारे ४५२८ चौ.मी.आहे .


२. भिंतींमध्ये एरेटेड ब्लॉक्स वापरले जातात. पारंपारिक विटांप्रमाणे एरेटेड ब्लॉकमध्ये माती वापरली जात नसल्याने नैसर्गिक मातीची बचत झाली. एरेटेड ब्लॉक्स हलके असतात आणि त्यामुळे आर.सी. सी. कामामध्ये स्टीलची बचत होते. एरेटेड ब्लॉक्स अधिक उष्णता रोधक असल्याने एअर कंडिशनरवरील भार कमी होतो. त्यामुळे विद्युत बचत होऊन वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोळशाची बचत होते.


३. भिंतींच्या बाहेरील पृष्ठभागावर शेरा चादरी असतात. हे इमारतीला चांगले स्वरूप देते आणि उष्णता इन्सुलेशन म्हणून देखील कार्य करते त्यामुळे एअर कंडिशनरवरील भार कमी होतो.


४. खिडक्यांना दुहेरी काच आहेत. दोन काचामधील जागा उष्णता आणि आवाज पृथकाचे कार्य करते.५. विजेची बचत करण्यासाठी एलईडी दिवे, इन्व्हर्टर एअर कंडिशनर, डक्ट कुलर दिले जातात. विजेचा वापर कमी करण्यासाठी मर्यादित खोल्यांमध्ये एअर कंडिशनर पुरवले जातात.


६. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वातानाकुलित खोल्यांमध्ये ताजी हवा देणारी युनिट्स दिली आहेत.


७. इमारतीच्या आजूबाजूला खुले क्षेत्र आहे. मध्यवर्ती ओपन डक्ट पारदर्शक घुमटाने झाकलेले आहे. त्‍यामुळे इमारतीच्या आत नैसर्गिक प्रकाश मिळतो.


८. उच्च दर्जाचे प्लंबिंग आणि सॅनिटरी फिटिंग केली आहे. युरिनलला सेन्सर दिले आहेत . त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो. .


९. इमारीतीतील वाया जाणा-या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र पुरविले आहे. प्रक्रिया केलेले पाणी सिंचन, बीज प्रक्रिया इत्यादीसाठी वापरले जाते.१०. पावसाचे पाणी इमारतीच्या छतावरून फिल्टरद्वारे विहिरीत साठवण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


११. रस्ते आणि पार्किंगमध्ये पेव्हिंग ब्लॉक्स दिलेले आहेत जे कडक फुटपाथसाठी काम करतात आणि पावसाच्या पाण्याचा प्रवाह कमी करुन झिरपण्यास उपयोगी ठरतात.


१२. इमारत ही शहर बस आणि मेट्रो सेवेशी जोडलेली आहे. त्यामुळे इंधनाची (पेट्रोल) बचत होते. वाहनांच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट दिलेले आहेत.


१३. इमारतीसाठी रूफ टॉप सोलर एनर्जी पॉवर प्लांट वीज निर्माण करते.


१४. भारतीय ग्रीन बिल्डिंग कौन्सिलद्वार ईमारतीला गोल्ड रेटिंगने प्रमाणित केले आहे.


१५. इमारतीतील आरोग्यदायी वातावरणासाठी धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.