प्रकरण - IV

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५


कंपनीने कार्य पूर्ण करण्यासाठी निर्धारित केलेले मापदंड
कंपनीने विविध कार्ये पार पाडण्यासाठी कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे चांगल्या प्रकारे परिभाषित केली आहेत. हे खाली ठळक स्वरुपात दिले आहेत:

अधिकार सुपूर्द करणे - कंपनी कायदा, २०१३ आणि मेमोरँडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनने कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना‍ दिलेल्या अधिकारान्वये विविध स्तरांवर कंपनीच्या विभागीय प्रमुखांना/अधिका-यांना त्यांची कार्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अधिकार प्रदत्त केले आहेत.

संरचित धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे- वनविकास महामंडळाकडे प्रमुख कार्य नियंत्रित करणारी सुव्यवस्थित धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत. अधिकारी कार्ये पार पाडताना ठरवून दिलेल्या धोरणांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात.

सारग्रंथ: वनविकास महामंडळात करण्यात येणा-या सर्व महत्चाच्या कामाचा समावेश करुन प्रक्रीयात्मक सारग्रंथ बनविले गेले आहे. महामंडळात करण्यात येणारी कामे पद्धतशीर आणि प्रमाणित रीतीने पार पाडले जातात हे सारग्रंथामधील नियम सुनिश्चित करतात आणि त्यामुळे कामातील पक्षपातपणाचे उच्चाटन होते. सारग्रंथात समाविष्ट असलेली कार्ये पार पाडताना, अधिकारी या नियमावलीतील तरतुदींचे पालन करतात.

कायदयाच्या तरतुदींचे पालन. संबंधित कार्ये पार पाडताना, कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतीय राज्यघटनेतील लागू तरतुदी,नियम आणि कंपनीला लागू असलेले नियम आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.